माळते माळते
माळते मी माळते
केसात पावसाची फुले मी माळते
माळते माळते
माळते मी माळते
टपटप धरणी वरती
सांडून गेले घुंगुर अवतीभवती
या धारांना या धारांना
या धारांना छातीस कवटाळिते
माळते माळते
माळते मी माळते
केसात पावसाची फुले मी माळते
माळते माळते
माळते मी माळते
सरसर या सरीखाली
रुजेन बाई मी तर ओली ओली
या दंडावरी या दंडावरी
या दंडावरी जणू गाणे रोमांचते
माळते माळते
माळते मी माळते
केसात पावसाची फुले मी माळते
माळते माळते
माळते मी माळते
उतरले बालपण माझे हे खालती खालती
या आईला या आईला
या आईला फुटले पान्हे किती
आकाशीच्या या काचेच्या
या काचेच्या अवतळ्यास मी चुंबिते
माळते माळते
माळते मी माळते