मधुवंतीच्या सुरासुरांतुन आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम
एकदा दर्शन दे घनश्याम
नयनी माझ्या गोकुळ वसले
नयनी माझ्या गोकुळ वसले
यमुनेचे जळ गाली झरले
यमुनेचे जळ गाली झरले
राधेपरी मी सर्व वाहिले
राधेपरी मी सर्व वाहिले सुखशांतीचे धाम
एकदा दर्शन दे घनश्याम
एकदा दर्शन दे घनश्याम
वसंतांतले सरले कूजन
वसंतांतले सरले कूजन
तुझ्याविना हे उदास जीवन
तुझ्याविना हे उदास जीवन
शोधित तुजला फिरते वणवण
शोधित तुजला फिरते वणवण
नाहि जीवा विश्राम
एकदा दर्शन दे घनश्याम
एकदा दर्शन दे घनश्याम
दासी मीरा ये दाराशी
दासी मीरा ये दाराशी
घे गिरिधारी तव हृदयाशी
घे गिरिधारी तव हृदयाशी
या पायाशी मथुरा-काशी
या पायाशी मथुरा-काशी
तीर्थापरी हे नाम
एकदा दर्शन दे घनश्याम
एकदा दर्शन दे घनश्याम
मधुवंतीच्या सुरासुरांतुन
मधुवंतीच्या सुरासुरांतुन
आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम
एकदा दर्शन दे घनश्याम