एक होता काऊ
एक होता काऊ तो चिमणीला म्हणाला
एक होता काऊ तो चिमणीला म्हणाला
मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ
एक होता पोपट
एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट
एक होती घूस
एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
तू माझे अंग पूस,तू माझे अंग पूस,तू माझे अंग पूस
एक होती गाय
एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय
एक होते कासव
एक होते कासव ते चिमणीला म्हणाले
एक होते कासव ते चिमणीला म्हणाले
मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव ,मला चड्डी नेसव