[ Featuring Aaditi Mishra ]
सहज तिने जाता जाता
केला अवचित इशारा
गेली समोरून अशी वळून बघ जरा
केल घायाळ कसं मला जहरी तुझी अदा
गेली समोरून अशी वळून बघ जरा
केल घायाळ कसं मला जहरी तुझी अदा
लटका राग सोडून
माझा तू हाथ धरून
लटका राग सोडून
माझा तू हाथ धरून
सजणी काळीज दे ग तुझ मला
गेली समोरून अशी वळून बघ जरा
केल घायाळ जस मला जहरी तुझे अदा
भर भर आला तुझ्या ज्वानीचा ग
केवढ्याच फुल फुले मध्यान रात्रीला जस
लागलं पीस तुझ्या रूपाचं सजणी
माझ्या तू ध्यानीमनी
गेली समोरून अशी वळून बघ जरा
केल घायाळ कसं मला जहरी तुझी अदा
मी चिकलातला राजा तू महलातली राणी ग
कसं ग शोभल सांग आपली कहाणी ग
वाटत नाही भेटशील तू या जिंदगानीत
म्हणूनच करतो मी इतके बहाणे ग
सोप नाही तुझ्या शिवाय राहणे ग
त्रास देतो मला समोरून जाणे ग
तुझं समोरून जाणे ग
ला ला ला ला ला ला ला ला ला
हो हो हो हो हो हो हो हो
हेरला माझ्या नजरेनं प्रेमवीर हा
मुक्या नजरेनं घेतोस आजू बाजू ला शोध माझा
तडफडू नको सजणा मिठीत माझ्या ये
मिठीत रे मला तुझ्या घे
आली धावत तुझ्या साठी मला साथ दे
माझ्या प्रीतीची भेट हि गोडी मानून घे
लाजभय कसले
होठ तुझे हसले
लाजभय कसले
होठ तुझे हसले
सजणी होकार दिलास तू गं मला
गेली समोरून अशी वळून बघ जरा
प्रेम कसं असत ते मला बघायचंय
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेऊन तर प्रत्येक जण जगतो
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय