तू जगाचा सारथी तू, तू जगाची देवता
तू एकदंता वक्रतुंडा तू गणेशा मोरया
तुच माझा पाठिराखा तूच माझा देवता
तू विघ्नहर्ता भालचंद्रा तू गणेशा मोरया
तुझ्या चरणी सूर्यकोटी तू नभाचा चंद्रमा
तुझ्या चरणी सूर्यकोटी तू नभाचा चंद्रमा
बुद्धिदाता मोरया तू ज्ञानियांचा वारसा
तुझ्या चरणी लीन सारे मोरया रे मोरया
तू जगाचा सारथी तू, तू जगाची देवता
तू एकदंता वक्रतुंडा तू गणेशा मोरया...
कृपा चरणी तूच माझा मनी माझ्या सारखा
हरवुनी तुझ्यात मी लीन व्हावे मोरया
तुझ्या चरणी येउनी मार्ग होई मोकळे
संकटांना बळ देई खचू न देता सारखे
शुद्धविद्या कलादाता ज्ञानदाता मोरया
ब्रह्मा विष्णू तू महेशा गौरीपुत्रा मोरया
बुद्धिदाता मोरया तू ज्ञानियांचा वारसा
तुझ्या चरणी लीन सारे मोरया रे मोरया
तू जगाचा सारथी तू, तू जगाची देवता
तू एकदंता वक्रतुंडा तू गणेशा मोरया