ओठांवरती रोज प्रभाती ओठांवरती रोज प्रभाती
घ्यावे मंगल नाम
रघुपति राघव राजाराम
रघुपति राघव राजाराम
सुरेखसे ते संगमरवरी
पंचानन ते मम देव्हारी
हनुमंतासम हात जोडुनी
हनुमंतासम हात जोडुनी
पूजावा घनश्याम
रघुपति राघव राजाराम
पंचवटीच्या पाषाणांतुन
पंचवटीच्या पाषाणांतुन
नाम ऐकु ये श्रीरघुनंदन
गोदातीरी पर्णकुटीचे गोदातीरी पर्णकुटीचे
ज्याचे सुंदर धाम
रघुपति राघव राजाराम
भूलोकी या ऋषी वाल्मीकी
राम दर्शने होइ सार्थकी
परमार्थाचा मार्ग दाविती
परमार्थाचा मार्ग दाविती माझे प्रभु श्रीराम
रघुपति राघव राजाराम
रघुपति राघव राजाराम
ओठांवरती रोज प्रभाती
ओठांवरती रोज प्रभाती
घ्यावे मंगल नाम
रघुपति राघव राजाराम
रघुपति राघव राजाराम