स्वप्नावरी स्वप्न पडे ओ ओ
स्वप्नावरी स्वप्न पडे ओ ओ
स्वप्नावरी
नीज ना मला घे नीज ना मला घे
जागेपणी आठविते सारखी तुला
स्वप्नावरी स्वप्न पडे ओ ओ ओ
स्वप्नावरी
प्रीतीचे घोष तुझ्या कानी ऐकते
मूर्तीचे चित्र मूर्तीचे चित्र तुझ्या पदरी झाकिते
अंतरिचा भाव कधी तुज न उमगला
स्वप्नावरी स्वप्न पडे ओ ओ ओ
स्वप्नावरी
भोळी मी पोर तुला दुरून पूजिते
सांगावे गूज असे रोज योजिते
काय करू साधेना कठीण ती कला
स्वप्नावरी स्वप्न पडे ओ ओ ओ
स्वप्नावरी
हळूच तुझ्या छायेशी आज बोलते
शबरीच्या बोरांची शबरीच्या बोरांची
शपथ तुला घालते
भिल्लीणिची भक् ती त्या राम समजला
स्वप्नावरी स्वप्न पडे ओ ओ ओ
स्वप्नावरी