आ आ आ
राजसा जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हांविण बाई
राजसा, जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हांविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही?
राजसा
त्या दिशी करुन दिला विडा
त्या दिशी करुन दिला विडा
पिचला माझा चुडा, कहर भलताच
त्या दिशी करुन दिला विडा
पिचला माझा चुडा, कहर भलताच
भलताच रंगला काथ लाल ओठांत
राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, राजसा
(राजसा, जवळी जरा बसा)
(जीव हा पिसा तुम्हांविण बाई)
(कोणता करू शिणगार सांगा तरी काही?)
आ, राजसा
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा देह सकवार
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा देह सकवार
सोसता न येईल अशी दिली अंगार
राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, राजसा
(राजसा, जवळी जरा बसा)
(जीव हा पिसा तुम्हांविण बाई)
(कोणता करू शिणगार सांगा तरी काही?)
आ, राजसा
मी ज्वार नवतीचा भार
मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा, हिवाळी रात
राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, राजसा
(राजसा, जवळी जरा बसा)
(जीव हा पिसा तुम्हांविण बाई)
(कोणता करू शिणगार सांगा तरी काही?)
आ, राजसा