लाजर् या कळीला भ्रमर सांगतो काही
लाजर् या कळीला भ्रमर सांगतो काही
मी लाज लाजुनी लालस झाले बाई
लाजर् या कळीला भ्रमर सांगतो काही
जे सांगु नये ते सांगितले पदराने
जे सांगु नये ते सांगितले पदराने
मी अमृत घेता तुझ्यातले अधराने
मी अमृत घेता तुझ्यातले अधराने
गात्रात अनामिक गात्रात अनामिक स्वर झंकारून राही
मी लाज लाजुनी लालस झाले बाई
लाजर् या कळीला भ्रमर सांगतो काही
तू वदलासी मज जवळ घेउनी कानी
तू वदलासी मज जवळ घेउनी कानी
मी तुझाच आहे मी तुझाच आहे तू माझी फुलराणी
वाटते तुझ्यावीण वाटते तुझ्यावीण अर्थ जीवना नाही
मी लाज लाजुनी लालस झाले बाई
लाजर् या कळीला भ्रमर सांगतो काही