आ आ आ आ आ आ
हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का
देशील का देशील का
हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का
देशील का देशील का
बांधिन तेथे घरकुल चिमणे स्वर्गाचे ते रूप ठेंगणे
बांधिन तेथे घरकुल चिमणे स्वर्गाचे ते रूप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे रहावयाला येशील का
येशील का येशील का
दोन मनांची उघडी दारे दोन मनांची उघडी दारे
आत खेळते वसंत वारे आत खेळते वसंत वारे
दीप लोचनी सदैव तू रे संध्यातारक होशील का
होशील का होशील का
हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का
देशील का देशील का
घराभोवती निर्झर नाचे घराभोवती निर्झर नाचे
जाणुन अपुल्या गूढ मनाचे जाणुन अपुल्या गूढ मनाचे
झाकुन डोळे एकांताचे जवळी मजला घेशील का
घेशील का घेशील का
हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का
देशील का देशील का