[ Featuring ]
स्वप्न माझे का हरवले
सुख सारे दूर झाले
स्वप्न माझे का हरवले
सुख सारे दूर झाले
चुकले कशी हि पावले
सोबती असुनी अंतरे निनावी
कशी काळजाशी आसवे उरावी
वेदना उराशी दाटले
हरवली दूर का सावली
हरवली दूर का सावली
स्वप्न माझे का हरवले
सुख सारे दूर झाले
तुटली कशी हि बंधने
वाट चालताना साथ का सुटावी
मांडल्या घराची अशी राख व्हावी
वेदना उराशी दाटले
हरवली दूर का सावली
हरवली दूर का सावली
कधी गहिवारला क्षण अडखळा
जीव घुस्मटला का असा
ओ कधी भास जुना सुख देई पून्हा
सावरतो मना मी जसा
अधुऱ्या क्षणाची अधुरी कहानी
जाणून हि केला असा का गुन्हा मी
वेहती मला ह्या चाहुली
हरवली दूर का सावली
हरवली दूर का सावली
कधी हिरमुसला कधी बघ हसला
संसार असा रंगला वादळ उठता
का डगमगला हा डाव कुणी मोडला
ओल पापणीला भिजावे दुरावे
उरी दुःख आता वळूनी जरा ये
परतुनी गेल्या पावली
हरवली दूर का सावली
हरवली दूर का सावली
हरवली दूर का सावली
हरवली दूर का सावली