हम्म हम्म हम्म
ओ तुझे माझे नाते असे
फुले नि सुगंध जसे
सागर किनारा पर्वत अन अंबर
दवबिंदू वर्षा गड़े अन स्वर्ग
तू आहे म्हणून मी आहे
तूच माझी अन मी तुझा आहे
तुझ्याविना आता माझे
हे जीवन अपूर्ण आहे
है है है है है है है है
जीवन हे फुले तुझे माझ्या जीवनी येण्याने
सुखावतो मी सदा तुझ्या असण्याने
तू माझा आत्मा तू माझा श्वास
तू भरोसा तू विश्वास
तू माझा आत्मा तू माझा श्वास
तू भरोसा तू विश्वास
तू आहे म्हणून मी आहे
तूच माझी अन मी तुझा आहे
तुझ्यासवे आता माझे
हे जीवन संपूर्ण आहे