[ Featuring Bishnu Mohan ]
तुला पाहुन मिळते मला जी खुशी
तुला पाहुन मिळते मला जी खुशी
स्पर्शामध्ये ते नाही, स्पर्शामध्ये ते नाही
तुला आठवत राहण्यात आहे जी खुशी
भेटीमध्ये ते नाही, भेटीमध्ये ते नाही
दुरून तू मनमोहिनी दिसते
दुरून तू मनमोहिनी दिसते
प्रीत बरी दुरून-दुरून
तुला पाहुन मिळते मला जी खुशी
स्पर्शामध्ये ते नाही, स्पर्शामध्ये ते नाही, नाही, नाही
तू माझ्या दिसातं, रातीचं तुच
स्वप्नात माझ्या सजतेस तुच
नजरेमध्ये तू, हृदयामध्ये तू
आहे तरी पण शोधत तुच
तुला शोधत राहण्यात आहे जी खुशी
भेटीमध्ये ते नाही, भेटीमध्ये ते नाही
राधेच प्रेम जसे कृष्णावर
तसेच प्रेम माझे तुझ्यावर
रेशीम गाठी नातं साताजन्माच
मैत्रीचं नातं जन्मोजन्मीच
हे नातं जपण्यात आहे मला जी खुशी
तोडून ती खुशी नाही, तोडून ती खुशी नाही
दुरून तू मनमोहन वाटतो
दुरून तू मनमोहन वाटतो
प्रीत बरी दुरून-दुरून
आ आ आ आ आ आ आ