[ Featuring ]
सहवास सागराचा सहवास डोंगरांचा
झाडींत झाकलेला दिसतो थवा घरांचा
ऐशा कुणा घराशी माझे जडले नाते ओ ओ
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
सहवास सागराचा
या डोंगराळ देशीं या डोंगराळ देशीं
भूभाग चार हातीं
शिंपून घाम तेथे करतात लोक शेती
तव चित्र काव्यवेडे कोठे जडेल तेथें
तव चित्र काव्यवेडे कोठे जडेल तेथें ओ ओ
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
सहवास सागराचा
हो जेथे असाल तुम्ही जेथे असाल तुम्ही
दिनरात प्राणनाथा
तो गाव स्वर्ग माझा ते गेह् स्वर्ग माझा
मज आवडेल सारे तेथे घडेल ते ते
मज आवडेल सारे तेथे घडेल ते ते ओ ओ
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
नव नार नागरी तू तुज आवडेल का ते
सहवास सागराचा