नीज रे नीज रे बाळा
थांबिव हा तव चाळा
नीज रे नीज रे बाळा
थांबिव हा तव चाळा
मांडिवरी घेते पाळण्याशी नेते
अंगाई गाते वेल्हाळा
नीज रे नीज रे बाळा
थांबिव हा तव चाळा
टपोर सुंदर डोळे विसावले पापणींत
टपोर सुंदर डोळे विसावले पापणींत
मंद झाली स्मितरेषा लालसर जीवणीत
दमून भागून खोड्या संपवून झोपतो कृष्ण सावळा
नीज रे नीज रे बाळा
थांबिव हा तव चाळा
कौसल्येच्या रामापरी कीर्त वाढव दिगंतरी
कौसल्येच्या रामापरी कीर्त वाढव दिगंतरी
तुझ्या यशाचे शिखर
तुझ्या यशाचे शिखर
माझी मनाची पायरी
काजळ घालते
काजळ घालते
तीट मी करते दृष्ट नको लाडक्याला
नीज रे नीज रे बाळा
थांबिव हा तव चाळा