चांद मोहरे चांदणे झरे
झोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरे
चांद मोहरे चांदणे झरे
गगनातील नीलपरी उतरुनिया भूमीवरी
गगनातील नीलपरी उतरुनिया भूमीवरी
उचलुनिया नेती तुला उंच काय रे
उचलुनिया नेती तुला उंच काय रे
झोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरे
चांद मोहरे चांदणे झरे
उंच उंच गगनी तुला काय दिसे सांग मुला
उंच उंच गगनी तुला काय दिसे सांग मुला
दिसते का हळू विमान एक संचरे
दिसते का हळू विमान एक संचरे
झोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरे
चांद मोहरे चांदणे झरे
बसून आत कोण हसे कुशल कुणी तरुण पुसे
बसून आत कोण हसे कुशल कुणी तरुण पुसे
खचित तेच प्राणनाथ सांगू काय रे
खचित तेच प्राणनाथ सांगू काय रे
झोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरे
चांद मोहरे चांदणे झरे
जाग जरा नीज सोड पापा दे मजसी गोड
जाग जरा नीज सोड पापा दे मजसी गोड
फिरुनी जाय लंघुनीया सात अंबरे
फिरुनी जाय लंघुनीया सात अंबरे
झोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरे
चांद मोहरे चांदणे झरे