या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासविण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यांस नभांगण घरकुल तुमची छाती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
सावलीत ही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी
नव्हेत डोळे नव्हेत पक्षी ही तर अक्षय नाती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती