रसिकहो अशा भोसले यांनी गाऊन लोकप्रिय केलेल्या
गीतांचा इतिहास मोठा मनोरंजक आहे
सन एकोणीसशे चोपन पंचावन्नचा सुमार असावा
एच एम वी सारख्या रेकॉर्डिंग कंपनीने
आपली गाणी रेकॉर्ड करावीत म्हणून
एच एम वी च्या ऑफिसात वरचे वर खेटे घालणाऱ्या
धपड्या संगीतकारांमध्ये मी एक होतोच की
विसरशील खास मला या माझ्या गाण्याची चाल
त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांनी नापसंत केली होती
म्हणाले डल आहे जरा ब्राईट चाल काढाना
मी काहीच ना बोलता निघून गेलो
एकोणीसशे पंचावन्न साली मी आकाशवाणीच्या
सेवेत रुजू झालो होतो तिथे हे गीत मी
सुधा मल्होत्रा यांनी शिकवलं आणि ते तेथून
ध्वनी शेपित ही झालं तेव्हा पासून ते गीत
अधिक अधिक लोकप्रिय ही होत गेलं आणि त्यानंतर
अनेक अनेक पत्र लोकांकडून येत गेली या गीताची
रेकॉर्ड कुठे मिळेल का अशी विचारणा अनेकांकडून
वारंवार झाली या गीतावर आशा भोसले
यांचा तर प्रेमच बसलं होतं आणि शेवटी
तेच झालं एच एम वी नेच ती रेकॉर्ड केली
ती आशा बाईंच्या स्वरात मला वाटतं
त्या गाण्याचा नशीबच बलवत्तर असावं
बघाना एखाद्या मुलीला आपण नापसंत करावं
आणि योगायोगाने तिच्याशीच आपलं लग्न व्हावं
तसाच काहीसा घडलं नाही का
विसरशील खास मला दृष्टिआड होता
विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोडगोड देशि जरी आता
विसरशील खास मला
दृष्टिआड झाल्यावर सृष्टीही निराळी
व्यवसायही विविध विविध विषय भोवताली
गुंतता तयांत कुठे
गुंतता तयांत कुठे वचना आठवीता
वचना आठवीता
विसरशील खास मला
स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता
वचने ही गोडगोड देशि जरी आता
विसरशील खास मला
अंतरिची आग तुला जाणवू कशाने
अंतरिची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे
यापरता दृष्टिआड
यापरता दृष्टिआड होऊ नको नाथा
होऊ नको नाथा
होऊ नको नाथा
वचने ही गोडगोड देशि जरी आता
विसरशील खास मला