रात्रीच्या धुंद समयाला
रात्रीच्या धुंद समयाला
शिणगार साज मी केला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
रात्रीच्या धुंद समयाला
हृदयाची कळी जागली
शिणविली नयनबाहुली
हृदयाची कळी जागली
वाट बघुन जीव हा
वाट बघुन जीव हा थकला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
रात्रीच्या धुंद समयाला
ओठांत भाव थरकले
घुंगरू घुंगरू घुंगरू छनन वाजले
ओठांत भाव थरकले
घुंगरू छनन वाजले
बांधला सुरांचा झोला
सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
रात्रीच्या धुंद समयाला
तबकात विड्यांचा थाट
केशरी गंध वार् यात हो
तबकात विड्यांचा थाट
केशरी गंध वार् यात
प्रणयास आगळा थाट
चौरंग चौरंग बाहुचा केला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला
हो सख्या घडीभर बसुनी बोला