हाय बय्या
अर्ध्या रात्री यमुना पात्री कर त्याने धरिला
गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
रंगरंग नीत मजसी खेळतो रंगनाथ माझा
मी मेवाडी राजदुलारी मथुरेचा तो राजा
जगावेगळी माझी सत्ता ध्यास न दुसरा उरला
गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
फेर धरून मी नाच नाचले न्याहळते शामा
मीच राधिका मीच रुक्मिणी मीच तयाची भामा
मुखी नाचते नाम तयाचे ताल पैंजणी उरला
गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
कालिंदीच्या तटी कलयुगी रोज रंगते होरी रोज रंगते होरी
भिजे ओढणी भिजे कंचुकी भिजती अंगी सारी
आनंदाचा पडतो पाऊस
आनंदाचा पडतो पाऊस मेघ सावळा सरला
गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला