झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा सोन्याचांदीच्या पेठा
मामाचा गाव मोठा सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन येऊया मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको गोरटी
मामाची बायको गोरटी म्हणेल कुठली पोरटी
हां हम्म
भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण
मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा तालेवार रेशीम घेईल हजार वार
मामा मोठा तालेवार रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया