काय करू मी बोला घरी पाळणा सुना
नवनवसाचा बाळ माझा येईल का हो पुन्हा
काय करू मी बोला बोला
जीवापाड मी होते जपले हासर् या मुखीचे अमृत प्याले
चिमणे अश्रु पटपट टिपले चिमणे अश्रु पटपट टिपले
चुकुनी स्वप् नी कधि न बोलले
चुकुनी स्वप् नी कधि न बोलले
एकही शब्द उणा काय करू मी बोला बोला
काळजात या घरे पाडुनी घरभर फिरती गोड आठवणी
व्याकुळ हो उनि उरी कवळुनी व्याकुळ हो उनि उरी कवळुनी
चुंबित माया खेळ खेळणी
फुटतो मज पान्हा काय करू मी बोला बोला
सुख माझे ते मुठीत इवले देवा का रे नाही बघवले
पोटी घालुनि तुवाच नेले पोटी घालुनि तुवाच नेले
जन्मीचे मज शासन घडले माझा काय गुन्हा
काय करू मी बोला घरी पाळणा सुना
नवनवसाचा बाळ माझा येईल का हो पुन्हा
काय करू मी बोला बोला