काल मी रघुनंदन पहिले
काल मी रघुनंदन पहिले
शाम मनोहर रूप पाहता पाहतचि राहिले
रघुनंदन पहिले काल मी रघुनंदन पहिले
विसरून मंदिर विसरून पूजा
मने पूजिला तो युवराजा
विसरून मंदिर विसरून पूजा
मने पूजिला तो युवराजा
अबोध कसले अश्रू माझ्या डोळ्यांतून वाहिले
रघुनंदन पहिले काल मी रघुनंदन पहिले
वीर वेश ते तरूण धनुर्धर
जिंकून गेले माझे अंतर
वीर वेश ते तरूण धनुर्धर
जिंकून गेले माझे अंतर
त्या नयनांचे चंद्रबाण मी हृदयी या साहिले
रघुनंदन पहिले काल मी रघुनंदन पहिले
रुपले शर ते अजुनी खुपती
एक दृश्य ते डोळे जपती
रुपले शर ते अजुनी खुपती
एक दृश्य ते डोळे जपती
प्रिये मांडवी जीवित माझे त्यांना मी वाहिले
रघुनंदन पहिले काल मी रघुनंदन पहिले
काल मी रघुनंदन पहिले