हसुनि एकदा मला मुकुंदा केलेस का रे वेडे
चित्र तुझे रे नेत्र काढते बघ ना तू बघ ना माझ्याकडे
मुकुंदा बघ ना माझ्याकडे
मोरमुकुट तो तुला शोभला
चंद्र केशरी भाळी रेखिला
मोरमुकुट तो तुला शोभला
चंद्र केशरी भाळी रेखिला
नकळत जुळले कर गोपाळा
नकळत जुळले कर गोपाळा
नको मिटु तू नेत्रकमळा
नको मिटु तू नेत्रकमळा प्रीत भृंग सापडे
मुकुंदा प्रीत भृंग सापडे हो
हसुनि एकदा मला मुकुंदा
अधर चुंबनी मधुरा रमली
नको श्रीधरा घुमवु मुरली
अधर चुंबनी मधुरा रमली
नको श्रीधरा घुमवु मुरली
ढळे पापणी गळे कुंचली
ढळे पापणी गळे कुंचली
सुरासंगती अंतराळी
सुरासंगती अंतराळी चित्तपाखरू उडे
मुकुंदा चित्तपाखरू उडे हो
हसुनि एकदा मला मुकुंदा
कुणी अपुरे ते पूर्ण केले
चित्र तुझे रे मीच झाले
कुणी अपुरे ते पूर्ण केले
चित्र तुझे रे मीच झाले
हसलासी तू विश्व हसले
हसलासी तू विश्व हसले
चंद्र काळा नवल घडले
चंद्र काळा नवल घडले लख्ख चांदणे पडे
मुकुंदा लख्ख चांदणे पडे हो
हसुनि एकदा मला मुकुंदा केलेस का रे वेडे
चित्र तुझे रे नेत्र काढते बघ ना तू बघ ना माझ्याकडे
मुकुंदा बघ ना माझ्याकडे