[ Featuring ]
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
का उगाच येते बाई गाणे माझ्या गळा
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
ओ ओ ओ ओ
दाटली ग सांज बाई दिवस बुडाया आला
अंतरी कशाचा उजेड माझ्या झाला
ओ ओ ओ ओ
का असा अचानक हा डोले ग जोंधळा
का असा अचानक हा डोले ग जोंधळा
का उगाच येते बाई गाणे माझ्या गळा
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
ओ ओ ओ ओ
तुज रात्रंदिवस ओढ ज्याची भारी
धुंडीत तुला ती मळ्यात फिरे स्वारी मळ्यात फिरे स्वारी
ओ ओ ओ ओ
तो वसंत वेडा ग त्याची तू कोकिळा
तो वसंत वेडा ग त्याची तू कोकिळा
का उगाच येते बाई गाणे माझ्या गळा
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
ओ ओ ओ ओ
लपंडाव का असा तोंड तरी पाहू दे
लपंडाव का असा तोंड तरी पाहू दे
ना अशीच मनीची प्रीत तुझ्या गाऊ दे प्रीत अशी गाऊ दे
ओ ओ ओ ओ
होऊ दे गळ्यातील हा साद पुरा मोकळा
होऊ दे गळ्यातील हा साद पुरा मोकळा
का उगाच येते बाई गाणे माझ्या गळा
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा