हाय बुगडी माझी सांडली गं
जाता साताऱ्याला गं
जाता साताऱ्याला
चुगली नका सांगू गं
माझ्या म्हाताऱ्याला
गं माझ्या म्हाताऱ्याला
चुगली नका सांगू गं
कुणी हिच्या म्हाताऱ्याला
गं हिच्या म्हाताऱ्याला
माझ्या शेजारी तरूण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुणेने जवळ बाहतो
जवळ पाहतो जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले गं बाई
त्याच्या इशाऱ्याला त्याच्या इशाऱ्याला
चुगली नका सांगू गं
कुणी हिच्या म्हाताऱ्याला
गं हिच्या म्हाताऱ्याला
हाय बुगडी माझी सांडली गं
जाता साताऱ्याला गं
जाता साताऱ्याला
आज अचानक घरी तो आला
आज अचानक घरी तो आला
पैरण फेटा नि पाठीस शमला
फार गोड तो मजसी गमला
मजसी गमला मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई
त्याला शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला
चुगली नका सांगू गं
कुणी हिच्या म्हाताऱ्याला
गं हिच्या म्हाताऱ्याला
हाय बुगडी माझी सांडली गं
जाता साताऱ्याला गं
जाता साताऱ्याला
घरात नव्हते तेव्हां बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तोबा-तोबा
तौबा-तोबा तोबा-तोबा
वितळू लागे गं लोणी बाई
बघता निखाऱ्याला
बघतानिखाऱ्याला
चुगली नका सांगू गं
कुणी हिच्या म्हाताऱ्याला गं
हिच्या म्हाताऱ्याला
हाय बुगडी माझी सांडली गं
जाता साताऱ्याला गं
जाता साताऱ्याला