आ आ आ अपुरे माझे स्वप्न राहिले
अपुरे माझे स्वप्न राहिले
का नयनांनो जागे केले
अपुरे माझे स्वप्न राहिले
ओळख तुमची सांगुन स्वारी सांगुन स्वारी
आली होती माझ्या दारी माझ्या दारी
'कोण हवे हो' म्हणता त्यांना
'कोण हवे हो' म्हणता त्यांना
दटावून मज घरात नेले
अपुरे माझे स्वप्न राहिले
अपुरे माझे स्वप्न राहिले
बोलत बसता वगळुन मजला
गुपित चोरटे ऐकु कशाला
जाण्याचा ते करुनि बहाणा
जाण्याचा ते करुनि बहाणा
गुपचुप माझ्या मनात लपले
अपुरे माझे स्वप्न राहिले
अपुरे माझे स्वप्न राहिले
नीज सुखाची तुम्हा लागली तुम्हा लागली
मंद पाउली स्वारी आली स्वारी आली
गोड खळीने चहाडी केली
गोड खळीने चहाडी केली
अधरासी नच बोलु दिले
अपुरे माझे स्वप्न राहिले
अपुरे माझे स्वप्न राहिले
का नयनांनो जागे केले
अपुरे माझे स्वप्न राहिले