[ Featuring ]
पाहुन रूप ते गोजिरवाणं, मोह होई माझा मनास
वकृतुंड तू महागणपती, लागे सदैव तुझीच आस
पाहुन रूप ते गोजिरवाणं, मोह होई माझा मनास
वकृतुंड तू महागणपती, लागे सदैव तुझीच आस
उधळूनी पुष्पे तुझ्याच चरणी, ओंजळ व्हावी रिति
ओढ लागली तुझी मनाला, हर्ष दाटतो उरी
नाव घेउनी मोरयाचे मुखी, मुखी
मन वाट पाहते फक्त तुझी रे तुझी, तुझी
नाव घेउनी मोरयाचे मुखी, मुखी
मन वाट पाहते फक्त तुझी रे तुझी, तुझी
किती मनोहर तू गणेशा, तुझीच भक्ती सदा सर्वदा,
मांगल्याचा तूच दाता, रिद्धी-सिद्धीचा तू उद्गाता
बरसुनी गेल्या श्रावण मासी रिमझिम रिमझिम सरी
ओढ लागली तुझी मनाला, हर्ष दाटतो उरी
नाव घेउनी मोरयाचे मुखी, मुखी
मन वाट पाहते फक्त तुझी रे तुझी, तुझी
नाव घेउनी मोरयाचे मुखी, मुखी
मन वाट पाहते फक्त तुझी रे तुझी, तुझी
छबी तुझी किती निरागस, हरपुन जाई भान
अनादी तू, अनंत तू, आम्चा तू तारणहार
आ आ आ
छबी तुझी किती निरागस, हरपुन जाई भान
अनादी तू, अनंत तू, आम्चा तू तारणहार
आसमंती गुलाल उधळूनी, होई गुलाबी नक्षी
हुरहूर लागे अशी जीवाला,लवकर ये तू घरी
नाव घेउनी मोरयाचे मुखी, मुखी
मन वाट पाहते फक्त तुझी रे तुझी, तुझी
नाव घेउनी मोरयाचे मुखी, मुखी
मन वाट पाहते फक्त तुझी रे तुझी, तुझी
नाव घेउनी मोरयाचे मुखी, मुखी(मोरया)
मन वाट पाहते फक्त तुझी रे तुझी, तुझी(मोरया)
नाव घेउनी मोरयाचे मुखी, मुखी(मोरया)
मन वाट पाहते फक्त तुझी रे तुझी, तुझी(मोरया)